पुणे- नाशिक महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू
1 min read
आळेफाटा दि.२३:- वडगाव आनंद (ता.जुन्नर) येथील मुकाई मळा परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाला आहे.पुणे – नाशिक महामार्गावरील आळेफाटा बायपास रस्त्यातील मूकाई मळा येथे शुक्रवार दि.२२ रात्री बारा वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी बिबट मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे आळे वनपाल संतोष साळुंके, वनमजूर वी.के. खर्गे, रेस्क्यू टीमचे बाबाजी खरगे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
ओतूर वर परिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय वाहनातून सदर बिबट्याला माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात पुढील कार्यवाहीसाठी नेण्यात आले आहे.
जुन्नर तालुक्यात बिबट्यांची संख्या वाढल्यामुळे बिबटे सध्या सैरभर झाले असून नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास होत आहे. पाणी तसेच खाद्याच्या शोधात हे बिबटे रात्री अपरात्री फिरत असतात. रस्ता क्रॉस करताना अज्ञात वाहनाची धडक बसून बिबट्याचा मृत्यू झाला आहे.