आळे येथे चोरट्यांनी डी.पी चोरली; आळेफाटा पोलिसांत गुन्हा दाखल
1 min readआळेफाटा दि.२२:- आळे या ठिकाणी शेतात असलेल्या डि.पी. मधील तारा अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याची तक्रार आळेफाटा पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आळे (ता.जुन्नर) येथील कैचान मळ्यातील डि.पी. दि.११ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास चोरटयांनी खाली उतरुन त्यामधील ता़ब्याच्या तारा काढुन चोरून नेल्या आहेत.
या घटनेला जवळपास दहा ते बारा दिवस झाले असुन येथील स्थानिक ग्रामस्थांनी नविन डि.पी. ची मागणी करून सुध्दा अद्याप या ठिकाणी दुसरी डिपी बसवली नसल्याने येथील नागरीकांचे अतोनात हाल होत आहे.
दरम्यान सध्या कडक असा उन्हाळा चालु असुन शेतात असलेल्या पिकांना पाणी द्यावे लागते परंतु या ठिकाणी लाईट नसल्याने पाणी असुन सुध्दा ते देता येत नसल्याने पिके जळू लागली आहेत.
त्यातच हे बिबट्या प्रवण क्षेत्रात मोडत असुन बिबट्याचा वावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर असल्याने येथील नागरीकांनी रात्रीचे घराबाहेर पडायला भिंती वाटू लागली आहे. तरी या ठिकाणी महा वितरण कंपणीने लवकरात लवकर नविन डि.पी बसवावी अशी मागणी केली आहे.