अवैध दारू विक्री प्रकरणी बोरी बु येथे आळेफाटा पोलिसांची कारवाई
1 min read
बोरी दि.२१:-बोरी (ता. जुन्नर) येथे अवैधरित्या देशी दारू विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला दारू विक्री करताना असून जी. एम संत्रा कंपनीच्या १५ कार्टर आळेफाटा पोलिसांना मिळून आल्या.
असून याबाबत आळेफाटा पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की,शनिवार दि.२० रोजी रात्री बोरी (ता.जुन्नर) येथील योगेश चंद्रकांत जाधव ) राहणार बोरी ता. जुन्नर, जि. पुणे) याकडे कुकडी नदीच्या किनाऱ्यावरती एका ठिकाणी अवैधरित्या जी एम संत्रा
कंपनीच्या १८० मिली च्या १५ क्वार्टर प्रत्येकी किंमत ७० रुपये प्रमाणे १०५० रुपयांची अवैध दारू मिळून आली. अवैध दारू बाळगल्या प्रकरणी आळेफाटा पोलिसांत योगेश जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला
असून विकास चंद्रकांत सोनवणे पोलीस कॉन्स्टेबल आळेफाटा यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पाखरे करत आहेत.