निमगिरीच्या वृद्ध शेतकऱ्याला ४८ हजाराला गंडा
1 min read
जुन्नर, दि.२०:- ७० वर्षीय शेतकरी सोसायटीची कर्जरक्कम भरण्याकरिता जुन्नरमधील जनता बँकेमध्ये आलेले असताना दोन अनोळखींनी त्यांना तुमच्या नोटांचे नंबर बघायचे आहेत असे म्हणून त्यांच्याकडील पैसे खाली पाडून त्यामधील ४८ हजार ५०० रुपये हात चलाखीने चोरून नेल्याची घटना बँकेत गर्दीवेळी घडली.सखाराम लांडे (रा. निमगिरी, जुन्नर) यांनी फिर्याद नोंद केली आहे. ते जुन्नरमधील जनता सहकारी बँकेत सोसायटीची कर्जरक्कम भरण्याकरिता दीड लाख रुपये घेऊन आले होते. कॅशिअर रूमबाहेर पैसे भरण्याकरिता रांगेत बसलेले असताना दोन अनोळखी व्यक्ती तेथे आल्या. त्यावेळी दोघांनी हात चलाखीने नोटा लंपास केल्या.