बेल्ह्यात तेरा गोवंशाची सुटका, चार इसमांवर कारवाई
1 min read
बेल्हे दि.२७:- आळेफाटा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या बेल्हे पोलीस दुरक्षेत्राचे कर्मचारी बेल्हे परिसरात बुधवार (दि.२४) रोजी रात्री गस्त घालत असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार बेल्हे – साकोरी रस्त्यावरील खराडे वस्ती समोर असणाऱ्या वसीम बेपारी यांच्या शेडमध्ये तेरा गाई व आयशर कंपनीचा ट्रक असा एकूण २७ लाख २५ हजार रुपयांचा माल जप्त करून चार इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस हवालदार विकास गोसावी त्यांच्या सहकाऱ्यांसह बेल्हे परिसरात नेहमीप्रमाणे गस्त घालत असताना रात्री बारा वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार बेल्हे साकोरी रस्त्यावर असणाऱ्या खराडे वस्ती समोरील वसीम बेपारी यांच्या शेडजवळ विटकरी रंगाचा आयशर कंपनीचा ट्रक (एम एच ४४ टी ७४८६).
मध्ये चारा पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता दाटीवाटीने काळ्या पांढऱ्या रंगाच्या ११ जर्सी गाई व तांबड्या रंगाच्या दोन गाई भरलेल्या आढळून आल्यावर त्या कत्तलीसाठी जामखेड (जि. अहमदनगर) येथे नेणार असल्याचे समजले, पोलीस हवालदार विकास गोसावी यांनी ताबडतोब जनावरांसह सदर ट्रक जप्त करून आळेफाटा पोलीस ठाण्यात नेला.
आणि शाहरुख सादिक सय्यद (वय २४, रा. माळी चिंचोरा, ता. नेवासा), वसीम गुलाबनबी बेपारी, नाजिम उर्फ पापा गुलाब बेपारी (रा. दोघेही बेल्हे ता. जुन्नर), फिरोज शेख (पूर्ण नाव माहित नाही, रा. घोडेगाव, ता. नेवासा) या चौघांवर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा व महाराष्ट्र प्राणी संरक्षण (गोवंश हत्या बंदी).
कायद्यानुसार प्रवीण सखाराम आल्हाट यांनी फिर्याद दिली असून पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर पुढील तपास करत असून पोलिसांनी सदर ट्रक जप्त केला व तेरा गाई संगमनेर येथील पांजरपोळात पाठवण्यात आल्या असून पोलिसांच्या या धाडसी कारवाई बद्दल व जागरूकपणे गस्त घालून गुन्हेगारांवर कारवाई केल्याबद्दल सर्व थरातून त्यांचे कौतुक होत आहे.