किराणा दुकानातून साडेचार कोटींचे ड्रग्ज जप्त; दुकानदाराला अटक; क्राईम ब्रँचची कारवाई

1 min read

ठाणे दि.५:- कल्याण क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईत एका किराणा दुकानातून तब्बल साडेचार कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.

या घटनेने अवैध – धंदेवाल्यांमध्ये खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. उल्हासनगर शहरातील हिल लाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका किराणा दुकानातून कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने साडेचार कोटी रुपयांच्या किमतीचे ड्रग्ज जप्त केले असून

ड्रग्स डीलर दुकानदारालाही अटक करण्यात आली आहे. या घटनेमागील मास्टरमाईंड मुख्य ड्रग्ज डीलर अद्यापही फरार आहे. दरम्यान, पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात असल्याची माहिती देण्यात आली.

अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी येथील गायत्री किराणा दुकानांमध्ये मोफेड्रॉन एमडी हा अंमलीपदार्थ बेकायदेशीररित्या विक्री करत असल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रँचला खबऱ्याकडून समजली होती.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे