रानमळा येथे श्री चारंगबाबा यात्रे निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
1 min read
रानमळा दि.२१:- रानमळा बेल्हे – अळकुटी रोड (ता.जुन्नर) येथील श्री चारंगबाबाची यात्रा बुधवार दि.२४ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाचे शोभा वाढवावी असे भावनिक आवाहन स्वामी समर्थ पतसंस्थेचे चेअरमन पप्पुशेठ गुंजाळ यांनी केले आहे. या यात्रा उत्सवात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. सकाळी ७ ते ८ चारंगबाबा चा अभिषेक, ८ ते १० मांडव डहाळे व प्रसाद, दुपारी २ ते ५ शिरणे वाटप, सायंकाळी ५ ते ८ महाप्रसाद, सायंकाळी ८ ते १० पालखी मिरवणूक व शोभेची दारू काम, रात्री १० वाजता सुरेशकुमार लोणी धामनीकर यांचा लोकनाट्य तमाशा चा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये कै. भाऊसाहेब भिमाजी डोंगरे यांच्या स्मरणार्थ विश्वास भाऊसाहेब डोंगरे (आदिती हुंडेकरी) तसेच कै. अभिमन्यू शंकर गुंजाळ यांच्या स्मरणार्थ शंकर धोंडीबा गुंजाळ (सेवानिवृत्त ए.एस आय) व रंजना जिजाभाऊ येवले / मामा परिवार यांच्या वतीने आमटी च्या महाप्रसादाचे अन्नदान करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी अनेक दानशूरांनी देणगी दिली आहे. या कार्यक्रमास दीड ते दोन हजार भाविकांसाठी आमटी भाकरीच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी कळस, पाडळी, बेल्हे व परिसरातील हजारो भाविक या यात्रेत सहभागी होत असतात. सुमारे चार ते साडेचार लाख रुपये खर्च करून चारंगबाबा देवस्थानच्या ओटा बांधकाम पूर्णत्वास आलेला आहे. श्री चारंगबाबा ओटा बांधकामासाठी देणगी देणाऱ्या सर्व दानशूर देणगीदारांचे जाहीर आभार.