शिंदेवाडी गावचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार; गाव बैठकीत एकमताने निर्णय
1 min read
आणे दि.२३:- आणे पठारावरील पाणी समितीने आणे, पेमदरा, शिंदेवाडी व पठारावरील सर्व वाड्यांच्या साठी उपसा सिंचन योजना राबवण्यासाठी फेर जल नियोजनामध्ये समावेश होत नाही तोपर्यंत शिंदेवाडी (ता.जुन्नर) गावचे सदर समितीचे निर्णय घेतला असून
त्यासाठी जोपर्यंत सकारात्मक निर्णय शासन घेत नाही व आणे पठार भागाचा जो पर्यंत कुकडी प्रकल्पच्या चौथ्या सुप्रीमात जो पर्यंत समावेश होत नाही तोपर्यंत लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी एकमताने घेतला आहे.
असा निर्णय मंगळवार दि.२३ रोजी गावबैठकीत घेण्यात आला. या आधी असाच निर्णय नळवणे ग्रामस्थांनी शनिवार दि.२० रोजी झालेल्या गावबैठकीत घेतला आहे.
सध्या गावातील तरुण वर्ग जो आपल्या कडे शेती असून शेती सिंचनासाठी पाणी नसल्यामुळे आपली माय भूमी सोडून पुणे- मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन नोकरी, व्यवसाय करावा लागतो.
आम्हाला पाणी द्या अशी मागणी बैठकीत केली. सदर गावबैठकीस मुंबईकर, पुणेकर मंडळी,अजित शिंदे, लक्ष्मण शिंदे, सुनिल शिंदे,पंढरीनाथ कडूस्कर, बाळासाहेब शिंदे, गंगाराम शिंदे,
गणेश शिंदे, खंडू बेलकर, प्रदीप शिंदे, रोहिदास शिंदे, गोरख शिंदे,राजू निकम,धोंडिभाऊ शिंदे, एम. डी. पाटील शिंदे सह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.