गुंजाळवाडीत मतदारांनी घेतली मतदान करण्याची शपथ
1 min readबेल्हे दि.२५:- स्वीप मतदार जनजागृती अंतर्गत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ बाबत निवडणूक अधिकाऱ्यांच्या मागदर्शनाखाली मतदार जनजागृती करणेकामी प्रचार व प्रसिद्धीचे काम सुरु असल्याने त्याचाच एक भाग म्हणून गुरुवार दि .२५ गुंजाळवाडीत (ता.जुन्नर) मतदार बंधू भगिनींनी एकत्र येत मी मतदान करणार अशी शपथ घेतली. या कार्यक्रमाचे नियोजन उपशिक्षक तुकाराम खोडदे यांनी केले. यावेळी अनेकांनी मी मतदान करणार या सेल्फी पॉईंट मध्ये फोटो घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामध्ये ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, शासकीय कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका व मतदार राजाने उत्स्फूर्त सहभाग घेऊन शपथ घेत लोकशाहीचे हात बळकट करण्याचे ठरवले.