आपल्या मुलांना संस्कार संपन्न घडवणे काळाची गरज:- हभप भागवताचार्य जगदीश महाराज सोनवणे

1 min read

परळी दि.२७:- परळी हभप भागवताचार्य जगदीश महाराज सोनवणे अध्यक्ष रत्नेश्वर वारकरी शिक्षण संस्था टोकवाडी (तालुका परळी जिल्हा बीड) यांचे 25 एप्रिल रोजी वान टाकळी तालुका परळी जिल्हा बीड येथे सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले. या प्रसंगी सोनवणे महाराजांच्या आपल्या रसाळ वाणीतून संत तुकाराम महाराज यांच्या गाथेतील देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती मागणी पर अभंग व निरूपण कीर्तन करत असताना देवाच्या संगतीचे महत्त्व सांगितले. देवाला विसरू नका म्हणजे दुःख होणार देवाच्या संगतीत राहिल्यावर माणसाचा उद्धार होतो. मुलांना संस्कारी बनवण्यासाठी वारकरी संप्रदायाचे शिक्षण देणे हे काळाची गरज आहे. मुलं जर संस्कार संपन्न झाले तर जीवनाची कल्याण आहे श्री रत्नेश्वर वारकरी शिक्षण संस्था टोकवाडी येथील विद्यार्थी फक्त पाच वर्षाचा ज्ञानेश सोनवणे व सुदर्शन शिंगाडे डिघोळ येथील नागनाथ शिंगाडे यांचा दहा वर्षाचा मुलगा फक्त दोन महिन्यात अतिशय सुंदर मृदंग वाजवत आहे. सोनवणे महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्था चे वैशिष्ट्य आहे.या मुलाचे वादन पाहून गावकरी मंडळाने हभप भागवताचार्य गुरुवर्य जगदीश महाराज सोनवणे यांचा सत्कार केला आहे. कीर्तनासाठी गायनाचार्य गुरुवर्य बाबासाहेब सोनवणे त्र्यंबक मंत्री, किसन जाधव, महादेव दहिवडी, छत्रगुण जाधव, शिवदत्त जाधव, नंदकुमार जाधव. अंगद जाधव, मृदंग वादक ज्ञानेश सोनवणे, महादेव जाधव, विशाल फड, ज्ञानेश्वर सातभाई, सुदर्शन शिंगाडे, राजवीर जाधव, वैभव कराड, ओमकार जाधव, अंगद जाधव उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे