आळेफाटा बाजारात १७८ गाईंची विक्री; ४५ लाखांची उलाढाल
1 min read
आळेफाटा दि.२१:-आळेफाटा (ता.जुन्नर) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (दि.१८) झालेल्या बाजारात १७८ गाईंची विक्री होऊन ४५ लाखांची झाली उलाढाल झाली. सध्याची चारा आणि पाण्याची दुष्काळी परिस्थितीत पशुधनाची विक्री वाढल्याचे पशुपालक सांगत आहेत.या आठवड्यात भरलेल्या बाजारात २१७ संकरित गाया विक्रीसाठी आल्या होत्या. यामध्ये १७८ गायींची विक्री होऊन ५ हजारांपासून ५५ हजार रुपयापर्यंत विक्री झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संजय काळे, सचिव रूपेश कवडे व आळेफाटा येथील कार्यालय प्रमुख प्रशांत महाबरे यांनी दिली.
जिल्ह्यात सर्वांत मोठा गाईंचा बाजार म्हणून प्रसिद्ध असलेला जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या आळेफाटा येथील उपबाजारात दर गुरुवारी भरत असतो. येथील बाजारात पारनेर,अकोले, पुणे, नाशिक, संगमनेर, ठाणे, नगर, अकोले, राजगुरुनगर तसेच इतर ठिकाणाहून संकरित दुधाळ जातीच्या गाया विक्री साठी येत असतात.
दरम्यान, सध्या कडक असा उन्हाळा चालू असून पाण्याची पातळी अतिशय कमी झाल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई तसेच जनावरांसाठी साठी लागणारा हिरवा चारा उपलब्ध नसल्याने त्यातच दिवसेंदिवस दुधाचे बाजारभाव कमी होत चालले आहे.
पशुखाद्याच्या किमती वाढतच चालल्याने याचा फटका आळेफाटा येथील गाई बाजाराला बसला असून जिरायती भागातील शेतकऱ्यांकडून गायींच्या खरेदी-विक्रीस अल्प प्रतिसाद मिळाला, तर गायींच्या किमती देखील उतरल्या आहेत.