आळे येथील श्री रेडा समाधी यात्रा महोत्सवाच्या नियोजनाची बैठक संपन्न; यात्रेची रूपरेषा ठरली 

1 min read

आळे दि.१८:- पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणुन ओळख असलेली व श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वेद बोलविलेल्या रेडा समाधी यात्रा महोत्सव दि.४ मे पासुन सुरू होत असल्याने वार्षिक यात्रेच्या नियोजनाची मिटींग येथील

मंदिरात श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे अध्यक्ष संदीप निमसे, यात्रौत्सव कमीटीचे अध्यक्ष गणेश शेळके, कार्याध्यक्ष एकनाथ कु-हाडे, धनंजय काळे, नीलेश पिंगळे, अमोल भुजबळ, अविनाश कुऱ्हाडे, व्यवस्थापक कान्हू पाटील कुऱ्हाडे, आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश होडकर,

प्रसन्न डोके, नवनाथ निमसे, विलास शिरतर, संतोष कुऱ्हाडे, जीवन शिंदे, म्हतु सहाने, पांडुरंग डावखर, संजय गाढवे, सुनील जाधव, गणेश शेळके, संदीप पाडेकर, होनाजी गुंजाळ, ज्ञानेश्वर गाढवे, दिनकर राहिंज, संतोष डावखर,निलेश भुजबळ आरोग्य विभाग,महावितरण कंपनी,पोलीस प्रशासन, एस.टी .महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

यावर्षी चैत्र वद्य दशमी दि.३ मे रोजी श्रींचा अभिषेक व दु २ ते ६ भजन महोत्सव, चैत्र वद्य एकादशी दिवशी शनिवार दि.४ एप्रिल रोजी सकाळी पहाटे ५ वाजता शासकीय महापूजा तहसीलदार रविंद्र सबनिस यांच्या हस्ते सपंन्न होणार असून दु १२ ते ५ ह.भ.प.पांडुरंग महाराज घुले यांचे

कीर्तन होणार असून संध्या ११ ते ५ तुकाईमाता विठ्ठल भक्त प्रासादिक भजनी भारुड मंडळ राजूरी यांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.दि.५ एप्रिल रोजी सकाळी महापूजा होणार असून संतवाडी, कोळवाडी,डावखरवाडी ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसाद चे आयोजन करण्यात आलेले आहे.

दुपारी ४ ते ८ कुस्त्या चा जंगी आखाडा आयोजित केला असून रात्री ९ ते ११ विशाल महाराज हाडवळे यांची कीर्तन सेवा संपन्न होणार आहे.६ मे रोजी ह.भ.प.सुदाम महाराज बनकर यांचे काल्याच्या किर्तणाने यात्रेची सांगता होणार आहे.

आळे येथील श्री ज्ञानेश्वर महाराज रेडा समाधीचे वैशिष्ट्य असे बाकी यात्रांप्रमाणे ह्या यात्रेत सांस्कृतिक कार्यक्रम नसतात किंवा तमाशा चे कार्यक्रम नसतात किंवा बैलगाडा शर्यती नसतात.ही यात्रा पूर्णपणे धार्मिक धर्तीवर आयोजन केले जाते.

ह्या यात्रेत प्रापंचिक सर्वच घरगुती वस्तू,कपडे यांचे विविध पाल,रेवड्या-शेव,भेळ, वडापाव विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल्स, कलिंगडाचे स्टॉल्स,आईस्क्रीम-थंड शीतपेय यांचे स्टॉल्स असतात.

त्यावर यात्रेत येणाऱ्या यात्रेकरू ची मांदियाळी असते. लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तिपर्यंत आकर्षण असलेले विविध पाळणे, मनोरंजनाचे विविध कार्यक्रम मिनी सर्कस,मौत का कुवा असे विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केलेले असते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे