आळे येथे श्री अंबिकामाता यात्रौत्सवात धावले १८० बैलगाडे
1 min read
आळे दि.१८:- आळे (ता.जुन्नर) येथील श्री अंबिकामाता यात्रौत्सवाच्या निमित्तांने भव्य अश्या बैलगाड्यांच्या स्पर्धा भरविण्यात आले होते. यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये श्रींची महापुजा, मांडव डहाळे व काठी पालखी तसेच भव्य अश्या बैल गाड्यांच्या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी ६१ हजार रुपयांचे, द्वितीय क्रमांकास ५१ हजार रुपये, तृतीय क्रमांकास ४१ हजार रुपये , चतुर्थ क्रमांकास ३३ हजार ३३३ रुपयांची बक्षीस देण्यात आले तसेच या स्पर्धेसाठी तिन फळीफोडमध्ये येणा-या प्रथम गाड्यासाठी ५ हजार ५५५ रूपये, द्वितीय क्रमांकासाठी ४ हजार ४४४, तृतीय क्रमांकासाठी ३ हजार ३३३ व चतुर्थ क्रमांकास २ हजार २२२ रुपयांचे बक्षिसे देण्यात आली.
तसेच फायनल मध्ये येणा-या बैलगाडयामध्ये प्रथम क्रमांकात प्रभाकर रामभाऊ वामन, भाऊ दादा लक्ष्मण कु-हाडे व पप्पुदादा मित्र मंडळ, द्वितीय क्रमांकात बबन शिवराम उंडेकर, प्रकाश गेणु डुंबरे, तृतीय क्रमांकात रोहीत निघोट, पप्पु दादा मित्र मंडळ, चतुर्थ क्रमांकात यलयर मोरे, पाचव्या क्रमांकास प्रकाश कबाडी, सहाव्या क्रमांकामध्ये राहुल मोरे, सातव्या क्रमांकात पै.संजुशेठ गुंजाळ व आठव्या क्रमांकात प्रकाश अंबाडी.
नवव्या क्रमांकास राहुल मोरे, दहाव्या क्रमांकाची संजु नाना गुंजाळ अकराव्या क्रमांकात रोहीत गागरे, कैलास कु-हाडे, बाराव्या क्रमांकात, राहुल मोरे व समर्थ कोरडे यांचा नंबर आला असुन विजेत्या बैलगाडा मालकांना मोटार सायकल, कुट्टी मशीन, फ्रिज,सोफा सेट, कुलर, टिव्ही,जुपता गाडा,सायकल,पंप,फॅन बक्षिस देण्यात आले.
घाटाचा राजा भाऊ मोरे बैलगाडा संघटना यांचा गाडा ठरला त्यांना ७ हजार ७७७ रुपये बक्षिस देण्यात आले . तर फळीफोडचे मानकरी -पैलवान संजय नाना गुंजाळ हे ठरले. २० फुट कांडे जोडुन प्रथम क्रमांकात येणा-या गाडयास ५ हजार रुपये देण्यात आले. तसेच १२सेकंदांत -१६गाडे ,१३ सेकंदात ४७गाडे, १४सेकंदात ४६ गाडे,२५ सेकंदात २४ गाडे व संपुर्ण स्पर्धेत १८० बैल गाडे धावले.
बैलगाडा स्पर्धेचे नियोजन भाऊ मोरे , विशाल कुऱ्हाडे, अक्षय कुऱ्हाडे , पै .विकासमामा निमसे, गितेश शिरतर, बंटी डावखर, अजय शिंदे ,अक्षय जेडगुले, तसेच सर्व यात्रा कमेटी व ग्रामस्थांनी केले होते अशी माहीती श्री अंबिकामात देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष रमेश कु-हाडे, उपाध्यक्ष मुकूंद भंडलकर, अविनाश कु-हाडे,संजय कु-हाडे, विलास शिरतर ग्रामस्थांनी दिली.