श्री पांडुरंग सार्वजनिक वाचनालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
1 min read
निमगाव सावा दि.१४:- श्री पांडुरंग सार्वजनिक वाचनालय निमगाव सावा (ता.जुन्नर) येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
श्री पांडुरंग सार्वजनिक वाचनालय निमगाव येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संतोष गाडगे पाटील अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस निमगाव सावा हे उपस्थित होते. तर अध्यक्षस्थान नवनाथ सावकार गाडगे उपाध्यक्ष श्री पांडुरंग वाचनालय यांनी भूषवले.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दोन्ही प्रतिमेला पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांनी प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर वाचनालयाचे संचालक संजय उनवणे यांनी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी बहुमोल अशी माहिती सांगितली.
या कार्यक्रमासाठी उपस्थितांमध्ये संतोष गाडगे पाटील अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस निमगाव सावा, रुपेश जावळे अध्यक्ष भीमशक्ती संघटना, यशवंत घोडे पाटील माजी सदस्य ग्रामपंचायत निमगाव सावा, किरण गोत्राळ संस्थापक मोरया प्रतिष्ठान, सुभाष जावळे, गणेश कांबळे प्रोप्रा.
महा-ई-सेवा केंद्र, जितेंद्र जावळे सामाजिक कार्यकर्ते, नवनाथ गाडगे उपाध्यक्ष पांडुरंग सार्वजनिक वाचनालय, संजय उनवने संचालक पांडुरंग सार्वजनिक वाचनालय, निलेश बेहेडे संचालक पांडुरंग सार्वजनिक वाचनालय,
सखाहरी खाडे संचालक पांडुरंग सार्वजनिक वाचनालय, बजाबा गाडगे, युसुफ पटेल, सनी, छबन आल्हाट, प्रदीप भालेराव, अब्दुल मजीद पटेल, ग्रंथपाल पंढरीनाथ घोडे व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.