शिवाईदेवी यात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

1 min read

बेल्हे दि.१३:- बांगरवाडी (ता. जुन्नर) येथील नगर-कल्याण हायवे रोड सोमवार (दि.१५) रोजी शिवाई देवीच्या उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या निमित्त सकाळी ८ वाजता मांडव डहाळे, सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत पूजा आणि अभिषेक संपन्न होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत शेरणी वाटपाचा कार्यक्रम होणार आहे.

त्यानंतर संध्याकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत हभप शोभाताई तांबे (ओतूर) यांचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसाद रात्री १० नंतर देवीची गाणी व देवीचा गोंधळ शाहीर स्वप्निल गायकवाड आणि पार्टी यांचा कार्यक्रम होणार आहे.

त्यामुळे यंदा विविध प्रकारचे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे नागरिक, भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे