लांडेवाडीत रंगला भव्य बैलगाडा शर्यतींचा थरार

1 min read

लांडेवाडी दि.१२:-उत्तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या लांडेवाडी येथे श्री भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त हरिनाम सप्ताह आणि चारशे वर बैलगाडयांसह दोन दिवस बैलगाडा शर्यत संपन्न होत असुन मोठ्या संख्येने नामांकित बैलगाडयांसह शर्यत पार पडत आहे.यात्रेनिमित्त प्रा सुरेखा निघोट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी तालुकाप्रमुख, आंबेगाव तसेच प्रा.अनिल निघोट मा. तालुकाप्रमुख भारतीय विद्यार्थी सेना आंबेगाव यांनी यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या.यात्रा कमिटीतील जानकु पानसरे, सरपंच अंकुश लांडे,मा सरपंच तानाजी शेवाळे, रामदास आढळराव, पत्रकार सदानंद शेवाळे, गणेश शेवाळे, भगवान शेवाळे, बबनराव गव्हाणे यांनी यात्रेची ऊत्तम व्यवस्था पाहिली.या बैलगाडा शर्यतीचे समालोचन आपल्या पहाडी आवाजात करुन साहेबराव आढळराव, लक्ष्मण बांगर आणि माऊली पिंगळे यांनी शर्यतीचा थरार बैलगाडा शौकिनांपर्यंत पोहोचवुन प्रेक्षकांची दाद मिळवली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे