आळे येथे श्री अंबिकामाता यात्रौत्सवाच्या निमित्ताने रंगणार बैलगाड्यांच्या शर्यतींचा थरार
1 min read
आळेफाटा दि.१३:- आळे (ता.जुन्नर) येथील श्री अंबिकामाता यात्रौत्सवाच्या निमित्तांने दि.१६ पासुन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असुन यामध्ये श्रींची महापुजा,मांडव डहाळे व काठी पालखी तसेच भव्य अश्या बैल गाड्यांच्या स्पर्धा,कुस्त्यांचा आखाडा आयोजीत केला आहे.बैलगाडा स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी ६१ हजार रुपये ,द्वितीय क्रमांकास ५१ हजार रुपये,तृतीय क्रमांकास ४१ हजार रुपये ,चतुर्थ क्रमांकास ३३ हजार ३३३ रुपयांची बक्षीस ठेवण्यात आली आहे तसेच या स्पर्धेसाठी तिनं फळीफोडमध्ये येणा-या प्रथम गाड्यासाठी ५ हजार ५५५ रूपये,द्वितीय क्रमांकासाठी ४ हजार ४४४.
तृतीय क्रमांकासाठी ३ हजार ३३३ व चतुर्थ क्रमांकास २ हजार २२२ रुपये तसेच दररोज फायनल मध्ये येणा-या बैलगाडयास प्रथम क्रमांकास एक मोटार सायकल द्वितीय क्रमांकासाठी एक मोटार सायकल व तृतीय क्रमांकासाठी एक कडबा कुट्टी मशीन,चतुर्थ क्रमांकास एक फ्रिज,पाचव्या क्रमांकासाठी,सोफा सेट,सहाव्या क्रमांकासाठी कुलर.
सातव्या व आठव्या क्रमांकास एल.इ.डी टिव्ही,नवव्या क्रमांकास जुपता गाडा ,दहाव्या व अकराव्या क्रमांकास सायकल,बाराव्या क्रमांकास बॅटरी पंप व तेराव्या व चौदाव्या क्रमांकास फॅन बक्षिस ठेवण्यात आले आहे. घाटाचा राजासाठी ७ हजार ७७७ रुपये, २० फुट कांडे जोडुन प्रथम क्रमांकात येणा-या गाडयास ५ हजार रुपये देण्यात येणार आहे.
तसेच यात्रेच्या पहिल्या दिवशी मंगला बनसोडे सह नितिनकुमार यांचा लोकनाट्य तमाशा आयोजित केला आहे.बैलगाड्यांचे टोकन दि.१४ रोजी श्री अंबिकामाता मंदिरात सकाळी १० वाजता लकी ड्रॉ पध्दतीने आयोजित केले आहे.
तसेच यात्रेच्या दुस-या दिवशी कुस्त्यांचा जंगी आखाडा आयोजीत केला असुन यासाठी फायनल साठी आकर्षक ढाल बक्षिस ठेवली आहे. अशी माहीती श्री अंबिकामात देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष रमेश कु-हाडे,उपाध्यक्ष मुकूंद भंडलकर,अविनाश कु-हाडे,संजय कु-हाडे व ग्रामस्थांनी दिली.