मुस्लिम बांधवांसाठी निमगाव सावात इफ्तार पार्टीचे आयोजन

1 min read

निमगाव सावा दि.११:- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान निमगाव सावा (ता.जुन्नर) ही सेवाभावी संस्था विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. सामाजिक एकोपा, सलोखा आणि बांधिलकी जोपासणे हे कर्तव्य मानून ही संस्था आपले कार्य करत आहे. “रमजान” या पवित्र महिन्यामध्ये मुस्लिम बांधवांचे उपवास असतात. रमजान महिन्यातील उपवास सोडण्यासाठी श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठानकडून निमगाव सावा येथील प्रसिद्ध दर्ग्यामध्ये इफ्तार पार्टी आयोजित केल्याचे पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विद्यमान सदस्य पांडुरंग पवार यांनी सांगितले. यावेळी मुस्लिम बांधवांना उपवास सोडण्यासाठी विविध प्रकारचे फराळ, फळे देण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संदीपान पवार, संचालक दत्तात्रय घोडे गुरुजी, निमगाव सावा चे माजी संचालक अब्दुल पटेल, सचिव परेश घोडे, निमगाव सावाचे सरपंच किशोर घोडे, निमगाव सावा युवक राष्ट्रवादी चे अध्यक्ष संतोष गाडगे, पांडुरंग पतसंस्थेचे माजी अध्यक्ष मुरलीधर काका काटे, बाळासाहेब गाडगे, प्रा. अनिल पडवळ यांच्यासह गावातील विविध मान्यवर आणि मुस्लिम आणि हिंदू बांधव उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे