बांगरवाडीच्या मोरांना मदतीची गरज; पशू मित्रांचं खाद्य पुरवण्यासाठी आवाहन

1 min read

बेल्हे दि.१०:- जुन्नर तालुक्यातील पूर्व भागात गुळूंचवाडी, आणे, पेमदरा, शिंदेवाडी, नळवणे, डोंगरवाडी या गावांत सध्या पाण्याची तीव्र टंचाई आहे.

वन्य प्राणी व पशू पक्षी पाण्यासाठी भटकंती करत आहेत. बांगरवाडी व गुळुंचवाडी या भागामध्ये २५० ते ३०० मोर असून या मोरांच्या खाद्याचा व पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामस्थ व पशु मित्रांनी या ठिकाणी पाणवठे तयार केले असून खाद्य ही आत्तापर्यंत पुरवले आहे. परंतु हे पानठे व खाद्य दिवसेंदिवस कमी पडत असून मोरांना गहू, ज्वारी,बाजरी,तांदूळ व इतर धान्य दानशूर व्यक्तींनी द्यावे असे आवाहन पक्षी मित्र नारायण सावंत तसेच सामाजिक कार्यकर्ते महेंद्र बांगर यांनी केले आहे. या भागात नागरिकांना ही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. विहिरी, बोअरवेल, कूपनलिका कोरड्याठाक पडल्याचे चित्र दिसून येत आहे.

माणसांबरोबर वन्य प्राणी पशू पक्षांचे पण पाण्यावाचून हाल होत असल्याचे दिसून येत आहे. जंगलात कुठेही पाण्याचा झरा शिल्लक न राहिल्यामुळे वन्य प्राणी हरीण, बिबट्या, मोर हे वन्यजीव आपल्या जीवाची पर्वा न करता पाणी थेट लोकवस्तीत येऊन आपली तहान भागवताना दिसून येत आहेत.ज्या ठिकाणी पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असते तेथे लोकांना पाण्याचे महत्व समजत नसते पण ज्या ठिकाणी पाण्याची टंचाई असते पाण्यासाठी वणवण करून एक एक हंडा पाण्याचा लांबून घरी घेऊन यावा लागतो तेथील लोकांना पाणी हे अमृतासमान असते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे