निमगाव सावात हौसाबाई गाडगे यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
1 min readनिमगाव सावा दि.९:- निमगाव सावा (ता.जुन्नर) येथे हौसाबाई गाडगे यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. या सोहळ्या प्रसंगी सायंकाळी ७ ते ८ या वेळेत शिव व्याख्याते सचिन भोजने यांचे व्याख्यान झाले ८ ते ८:३० या वेळात अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला. या वेळी सत्यशिल शेरकर चेअरमन (विघ्नहर कारखाना), भास्कर गाडगे, डॉ रामदास गाडगे, विकास चव्हाण, हभप नाना महाराज गांडाळ, आनंदा बेलकर, विजय गाडगे,जावळे गुरुजी, बंटी हाडवळे,ज्योती शिदे (अँडव्होकेट) यांनी शुभेच्छा दिल्या. आभार हभप विजय खाडे महाराज यांनी मानले. तर दुपारगुडे, संभाजी चव्हाण, विलास गांधी, भालचंद्र उनवणे, रमेश खरमाळे, बळीराम चव्हाण, राजु पोळ यांची उपस्थिती लाभली व कुटुंबातील आप्तेष्ट, नातेवाईक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्यशिल शेरकर बोलताना म्हणाले की या कुंटुबातील एक आगळा वेगळा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन आईचा अभिष्टचिंतन सोहळा साजरा केला. कुंटुबातील दोन्ही भावाचे कौतुक केले अनेक मान्यवरांनी शुभेच्छा देवुन गावातील समाज कार्यामध्ये दोन्ही भाऊ हिरारीने भाग घेवुन समाज कार्य करत आहे.रात्री ९ ते ११ कानिफनाथ प्रासादिक भजनी मंडळ औरंगपुर यांचा भजनाचा कार्यक्रम झाला. अशी माहिती गणेश गाडगे (होमगार्ड), सुनिल गाडगे (माजी सैनिक) यांनी दिली.