कुत्र्याची पिल्ले समजून तब्बल १५ दिवस ऊसतोड कामगारांनी पाळली कोल्ह्याची पिल्ले; वनविभागाने घेतली ताब्यात
1 min read
आळेफाटा दि.८:- शिरोली सुलतानपूर (ता.जुन्नर) येथील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये ऊस तोडणी चालू असताना ऊसतोड कामगारांना कोल्ह्याची दोन पिल्ले आढळून आले.
ही कुत्र्याची पिल्ले असल्याचं या ऊसतोड कामगारांना वाटले. कामगारांनी तब्बल पंधरा दिवस कुत्र्याची पिल्ले म्हणून सांभाळली.
सदर बाबत निमगाव गावाचे सामाजिक कार्यकर्ते अजित गाडगे यांच्या निदर्शनास आली. ही कुत्र्याची पिल्ले नसून कोल्ह्याची पिल्ले असल्याचे संबंधित ऊसतोड कामगारांना सांगितले.
सदरची माहिती अजित गाडगे यांनी तत्काळ वन विभागाला कळवली. ताबडतोब वन विभागाच्या टीमने ऊसतोड कामगारांकडून या पिल्लांचा ताबा घेतला व रेस्क्यू करत.
ही पिल्ले माणिक डोह येथील बिबट निवारण केंद्रात शासकीय वाहनात सुरक्षित रित्या घेऊन गेली. सदरची रेस्क्यू वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल भानुदास शिंदे, वनरक्षक महेश जगधने यांनी केली.
सदर पिल्लांची तपासणी करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. असल्याची माहिती वनपाल शिंदे यांनी दिली.