जिल्ह्यात चारा छावण्या सुरू करण्याची मागणी; प्रशासनाला निवेदन
1 min read
अहिल्यानगर दि.६:- दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याने जिल्ह्यात चारा टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी गोसेवा महासंघातर्फे जिल्हा प्रशासनाला करण्यात आली.यावेळी संजय नेवासकर, गौतम कराळे, ललित चोरडिया, दीपक महाराज काळे प्रशांत भापकर आदी उपस्थित होते.निवेदनात म्हटले आहे की, पावसाने दडी मारल्याने यंदा जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. गोशाळांमध्ये भाकड जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात ८० गोशाळा आहेत. शासनाकडून त्यांना कोणत्याही स्वरूपाचे अनुदान दिले जात नाही. त्यामुळे देणग्यांवरच गोशाळा चालवल्या जातात.
त्यामुळे किमान उन्हाळ्यात तरी या जनावरांना पाणी आणि चाऱ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली. मागणीचे निवेदन गाेशाळा चालकांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना दिले.