बेल्हे बस स्थानकावर पाणपोई

1 min read

बेल्हे दि.५:- कडक उन्हाळा सुरु झाला असल्यामुळे बेल्हे (ता.जुन्नर) एस टी बस स्टॉप वर पिन्याच्या पान्याची सोय नव्हती. त्यामुळे जानाऱ्या येणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे तेथील गावातील ग्रामस्थांनी शिवाजी डुंबरे, पांडू संगमनेरकर, किसन देशमुख, संजय पिंगट, संतोष पिंगट यांनी एकत्र येऊन चर्चा केली. पाणपोई सुरू करावी असा विषय चर्चेत आला व त्याची तातडिने अंमलबजावनी करन्यात आली. ह.भ.प. बाळशीराम महाराज बांगर यांच्या हस्ते पाणपोई सुरू करन्यात आली. ही फिल्टर युक्त शुद्ध पाण्याची पाणपोई असून यामुळे प्रवाशांची व शाळकरी मुलांची पिण्याच्या पाण्याची मोठी सोय झाली आहे. पाण्याअभावी अनेक जणांना उष्माघाताचा त्रास होऊ शकतो तसेच या सर्व सामान्य लोकांना पाणी बॉटल विकत घेणे शक्य नसल्याने सर्वसामान्य प्रवाशांनी संबंधित गावकऱ्यांचे आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे