हौसाबाई गाडगे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रम
1 min readनिमगाव सावा दि.४:- निमगाव सावा (बागवाडी) (ता.जुन्नर) येथील हौसाबाई विठ्ठल गाडगे यांचा अभिष्टचिंतन सोहळा रविवार दि.७ रोजी आयोजित केला आहे. अभिष्टचिंतन प्रसंगी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सायंकाळी 7 ते 8 सचिनजी भोजने शिव व्याख्याते यांचे व्याख्यान 8 ते 8:30 अभिष्टचिंतन कार्यक्रम व 8:30 ते 9 स्नेह भोजन तसेच 9 ते 10 कानिफनाथ प्रासादिक भजनी मंडळ औरंगपुर यांचे भजन व 10 ते 11 तानाजी माळवदकर आणि पार्टी यांचा अभिष्टचिंतन पर कार्यक्रम होईल व स्वयंभु सिद्धी विनायक इव्हेंटस व विघ्नहर साऊंड डेकोरेशन सुनिल गहिने व सुनिल गाडगे यांची लाभणार आहे. तरी सर्वांनी कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे आवाहन सुनिल विठ्ठल गाडगे माजी सैनिक व गणेश विठ्ठल गाडगे (होमगार्ड) व शशिकांत गाडगे द्राक्ष बागायतदार व रोहन बबन गाडगे यांनी केले आहे.