आजपासून उंचखडक येथे यात्रोत्सव; रंगणार बैलगाड्यांच्या शर्यतींचा थरार; प्रथम बक्षीस १ लाख रुपये 

1 min read

उंचखडक दि.२४:- उंचखडक (ता. जुन्नर) येथील श्री भैरवनाथ यात्रौत्सवाच्या निमित्ताने दि.२४ पासुन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असुन यामध्ये श्रींची महापुजा, मांडव डहाळे व काठी पालखी तसेच भव्य अशा बैल गाड्यांच्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत.

या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी १ लाख रुपये, द्वितीय क्रमांकास ७५ हजार रुपये, तृतीय क्रमांकास ५० हजार रुपये, चतुर्थ क्रमांकास २५ हजार रुपयांची बक्षीस ठेवण्यात आली आहे. प्रथम गाड्यासाठी १३ हजार, द्वितीय ७ हजार, तृतीय ५ हजार व चतुर्थ ३ हजार रुपये तसेच दररोज फायनल मध्ये येणा-या बैलगाड्यास एक मोटार सायकल

द्वितीय क्रमांकासाठी २५ हजार व द्वितीयसाठी११ हजार रुपयांचे बक्षिस ठेवण्यात आले आहे, अशी माहिती श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष संजय हाडवळे व सर्व संचालक मंडळ व ग्रामस्थांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे