ज्ञानराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष पदी दिलीप वाव्हळ यांची बिनविरोध निवड

1 min read

आळेफाटा दि.२२:- आळे (ता.जुन्नर) येथील ज्ञानराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी दिलीप धर्माजी वाव्हळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेची पंचवार्षिक निवडणुक नुकतीच बिनविरोध पार पडल्यानंतर संचालक मंडळाने अध्यक्ष पदी दिलीप वाव्हळ, उपाध्यक्ष पदी समीर माधव टकले, सचिवपदी जावेद पापा मोमीन, सहसचिव गणेश सुरेश शिंदे. खजिनदार पदी राजेंद्र रामकृष्ण वनारसे व अंर्तगत हिशोब तपाणसणीस संतोष बाळु राहिंज तर संचालक म्हणुन विठ्ठल जर्नादन जाधव,समीर शफी आतार,अमित सुरेश राहिंज,इम्रान लतिफ मनियार,सचिन विलास लाड,
सुप्रिया अरूण शिरतर,सुनिता मंगेश भालेराव यांची निवड झाली असुन. तज्ञ संचालक म्हणुन सुरेश भाऊ वाव्हळ व प्रितम नंदकुमार काळे यांची निवड करण्यात आली आहे. निवडणुक अधिकारी म्हणुन सहाय्यक निबंधक सचिन सरसमकर यांनी काम पाहीले अशी माहीती संस्थेचे व्यवस्थापक लक्ष्मण औटी व प्रशांत सोनवणे यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे