राजुरीत बंद घरातून १० लाख २० हजारांची रोकड चोरीला
1 min read
राजुरी दि.१८ :- जुन्नर तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून राजुरी या ठिकाणी बंद घराचा दरवाजा तोडुन चोरटयांनी १० लाख २० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना शनिवार दि.१६ रात्रीच्या सुमारास घडली.
याबाबत आळेफाटा पोलीस स्टेशनकडुन मिळालेल्या माहितीनुसार राजुरी (ता.जुन्नर) येथील बागवाडी या ठिकाणी रहात असलेले पांडुरंग शंकर हाडवळे हे काही कामाच्या निमित्ताने दि.१६ रोजी बाहेर गावी गेले होते व
सोमवार दि. १८ रोजी सकाळी घरी आल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा तोडलेल्या अवस्थेत दिसल्यानंतर त्यांनी आतमध्ये जाऊन पाहीले असता देवघरात असलेले लाकडी कपाटाचे लॉकर तोडुन त्यामध्ये असलेले 10 लाख रोख रक्कम (एकुण 500 रूपये दराच्या 2000 नोटा),
20 हजार रोख रक्कम (एकुण 200 रूपये दराच्या 100 नोटा) व 2500 एक गॅझन इंडीया कंपनीचे वायफायसाठीचे राउटर मशीन असा एकूण १० लाख २२ हजार ५०० रुपयांची चोरी झाली असल्याची निदर्शनास आले व याबाबतची फिर्याद पांडुरंग हाडवळे यांनी आळेफाटा पोलीस स्टेशन मध्ये दिली.
घटनास्थळी आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीष होडगर यांनी भेट देऊन पहाणी केली असुन पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर यांच्या मार्गदनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रागीणी कराळे, फौजदार चंद्रा डुंबरे हे करत आहेत. एवढी रक्कम घरात का ठेवली होती? एवढी रक्कम कसली होती? याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही.