वडगाव मावळ मधील गुटखा विक्रेत्यावर धडक कारवाई; कारवाईमध्ये अडीच लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; तिघांविरोधात गुन्हा दाखल

1 min read

वडगाव मावळ दि.१९:- लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. सत्यसाई कार्तीक यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी बातमी मिळाली होती की, वडगाव मावळ पो स्टे हद्दीत मोठ्या प्रमाणावर शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची विक्रीकरिता साठवणूक करण्यात आली. आहे. त्यावरून सहा.पोलीस अधीक्षक सत्यासाई कार्तीक यांनी दिनांक 18 रोजी त्यांचे पथकाला मिळालेल्या बातमीचे ठिकाणी पाठवले असता पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये वडगाव मधील संस्कृती कॉलनी येथील चंद्रकांत ढोरे यांनी भाड्याने दिलेल्या पत्र्याचे शेड मध्ये इसम नामे 1) मोहम्मद आरिफ मोहम्मद युसुफ सिद्धीकी. वय 25 वर्ष, राहणार संस्कृती कॉलनी, वडगाव, ता.मावळ, जि पुणे, व अन्य एक विधिसंघर्षग्रस्त बालक हे त्यांचे ताब्यात महाराष्ट्र राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला वेगवेगळ्या प्रकारचा एकूण सुमारे 2,52,000 रू. (अक्षरी दोन लाख बावन्न हजार रूपये) एवढ्या किमतीचां गुटखा बाळगताना मिळून आले असून नमूद आरोपींकडे केलेल्या प्राथमिक चौकशीत सदरचा माल हा इसम नामे .3)सलमान लियाकत हुसेन सिद्दिकी, वय अं 30 वर्ष, रा.संस्कृती कॉलनी, वडगाव, जिल्हा पुणे (सध्या फरार) याचे मालकीचा असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सदरचा मुद्दमाल जप्त करून वर नमूद तिन्ही आरोपींविरोधात वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे भादवि कलम 328 सह अन्न सुरक्षा अधिनियम 2006 चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत.सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा.पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सपोनि सचिन राऊळ, पोसई शुभम चव्हाण, पो.हवा नितेश (बंटी) कवडे पो.कॉ सुभाष शिंदे, पो.कॉ गणेश येळवंडे यांचे पथकाने केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे