शेतातून एक लाख रुपये किमतीच्या ड्रीपची चोरी; नारायणगाव पोलिसांत तक्रार दाखल
1 min read
हिवरे दि.१९:- हिवरे तर्फे नारायणगाव (ता.जुन्नर) येथील विशाल आनंता भोर ह्या शेतकऱ्याची सुमारे एक लाख रुपये किमतीची अज्ञात चोरांनी शेतीची ड्रीप चोरून नेली त्याची त्याची लेखी तक्रार भोर यांनी नारायणगाव पोलीस स्टेशन येथे केली आहे. भोर यांनी मनसे शेतकरी सेना पुणे जिल्हाध्यक्ष योगेश तोडकर अखिल भारतीय शेतकरी संघटना. पुणे जिल्हाध्यक्ष प्रमोद खांडगे सकल मराठा क्रांती मोर्चाचे पुणे जिल्हा प्रतिनिधी अनिल गावडे यांना त्यांनी फोन करून सांगितल्यानंतर तात्काळ घटनास्थळी भेट दिल्यानंतर प्रमोद खांडगे, योगेश तोडकर नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी तात्काळ शेतकऱ्याच्या ड्रीपची चोरी करणाऱ्या चोरांचा छडा लावावा व दिवसा जे भंगारवाले फिरत आहे.
त्यांची देखील सकोल चौकशी करावी नदीवरून शेतकऱ्यांचा लिफ्ट द्वारे शेतीला पाणीपुरवठा होत असतो त्या अनुषंगाने शेतकरी नदीमध्ये शेतीपंपासाठी वीजपंपाद्वारे शेतीला पाणीपुरवठा करत असतो. अनेक वर्षापासून शेतकऱ्यांची नदीवर असलेल्या मोटारींची व केबलची चोरी होत आहे.
मागील काही महिन्यापूर्वी केबल चोरी करणाऱ्या चोरांना पोलीस स्टेशन पकडले देखील होते. परंतु काही दिवस गेल्यानंतर त्यांचे हे चोरी करण्याचे सत्र चालूच आहे. त्याचा तात्काळ पोलिसांनी बंदोबस्त करावा ड्रिप चोरून नेणाऱ्या चोरांचा शोध लावून त्यांना अटक करावी.