घरफोडी व चोरी करणा-या आरोपींना पांचगणी पोलीसांनी केले जेरबंद
1 min read
पाचगणी दि.२१:- पाचगणी पोलीस ठाणे हद्दीत नविन बांधकाम चालु असलेल्या व बंद बंगल्यांचे चालु फिटींगमधिल वायर काढुन घेणे बाबत घरफोडी व चोरी सारखे गुन्हे दाखल झाले होते. सदर गुन्हयाचे तपासाबाबत पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक सातारा आंचल दलाल, उपविभागिय पोलीस अधिकारी वाई विभाग वाई, बाळासाहेब भालचीम यांनी दिले. सुचनाप्रमाणे व केलेल्या मार्गदर्शनावरुन पांचगणी पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक व तपासी पोलीस अंमलदार ६४४ पवार व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार पोना /९६२ शिंदे व पोकॉ/७६२ लोखंडे यांनी सदर घडणा-या गुन्हयाबाबत गोपनीय खब-यामार्फत माहीती मिळवुन मिळाले माहीतीच्या आधारे यातील आरोपी निष्पन्न केले आहेत.
१) ओकार संतोष राजपुरे, २) विषाल सुरेश आडागले,
३) सागर निलेश वैराट ४) दिपक नथुराम गोळे ५) रुषी वाडकर (पाहीजे आरोपीत) घरफोडी व चोरी करताना वापलेली वाहणे असा ऐकून २,४४,९००/- रुपये मुद्देमाल हस्तगत केला आहे.सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक सातारा आंचल दलाल. उपविभागिय पोलीस अधिकारी वाई विभाग वाई. बाळासाहेब भालचीम यांचे मार्गदर्शनाखाली पांचगणी पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक व तपासी पोलीस अंमलदार पोहवा/६४४ पवार यांनी आरोपी यांचेकडे चौकशी करुन चोरीस गेलेला माल हस्तगत केला आहे.
तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी पोउनि ननवरे, पोहवा/६४४ पवार, पोना/९६२ शिंदे व पोकॉ/७६२ लोखंडे यांनी सदर कारवाईमध्ये सहभाग घेतला असुन त्यांनी केले चांगले कामगिरीबाबत त्यांचे सर्वांचे मा. पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.