दुचाकी चोरणारा ओतूर पोलिसांनी केले जेरबंद
1 min read
ओतूर दि.२१:- जुन्नर तालुक्यात दिवसेंदिवस चोऱ्यांच्या प्रमाण वाढ झाली असून घरातील चोरी व वाहन चोरीचे प्रमाण वाढले आहे. ओतूर येथील पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने दुचाकी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला जेरबंद केले आहे. नवनाथ सुरेश खंडागळे (वय १८ रा.घारगाव ता.संगमनेर जि.अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून याबाबत किसन नाथा कडाळे यांनी ओतूर पोलिसात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की नवनाथ खंडागळे हा युवक रोहोकडी येथील किसन कडाळे यांच्या घरासमोर लावलेली दुचाकीचे रात्री १०:३० वाजण्या दरम्यान हॅन्डल लॉक तोडून गाडी चोरून नेण्याचा प्रयत्न करताना असताना नागरीकांनी पाहिले. त्यानंतर त्याचा पाठलाग करून पकडून ओतूर पोलिसांच्या ताब्यात दिले. (Junnar)सदर घटनेचा पुढील तपास ओतूरचे सहायक पोलिस निरीक्षक एल.जी.थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार आशा भवारी करत आहेत.