भौतिक सुखाची साधने उपलब्ध तरीही समाजातील नैतिक मूल्यांचा ऱ्हास होत चाललाय:- विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप भुजबळ
1 min read
आळेफाटा दि.१६:- विज्ञानाने माणसाला भौतिक सुखाची साधने उपलब्ध करून दिली तरीही समाजातील नैतिक मूल्यांचा ऱ्हास होत चालला असल्यामुळे सर्व काही असून देखील माणसे दुःखी आहेत. यासाठी विज्ञान आणि अध्यात्म यांचा समन्वय साधलेला मूल्याधिष्ठित समाज निर्माण होणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक (गुन्हा अन्वेषण विभाग) डॉ. दिलीप भुजबळ यांनी केले. श्री क्षेत्र आळे (ता.जुन्नर) येथे संत ज्ञानेश्वर महाराज रेडा समाधी मंदिरात महाशिवरात्रीला रेडेश्वर महाराजांच्या ७३१ व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने आयोजित केली जातात.
सामाजिक जाणिवेचा भाग म्हणून सप्ताह काळात प्रवचनाऐवजी काळाची गरज म्हणून महाविद्यालयीन तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकी, वाचन संस्कृती आणि राष्ट्रीय एकात्मतेसारखी मूल्ये रुजवण्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट व ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ आळे यांच्या संयुक्त विद्यमाने श्री ज्ञानेश्वर महाराज रेडा समाधी मंदिर येथे गतवर्षापासून ज्ञानामृत व्याख्यानमालेचे आयोजन करून विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्याचे काम या व्याख्यानमालेतून करण्यात आले.
दरम्यान या ठिकाणी आयोजीत केलेल्या सप्ताह कालावधीत डॉ.लता मुळे पाडेकर (संत ज्ञानेश्वर हरिपाठ), प्रा अनिल केंगार (संत एकनाथांच्या भारुडांतून जनजागृती), प्रा प्राचार्य प्रदीप कदम ( छत्रपती संभाजी महाराज) डॉ. शाकुराव कोरडे (मुंगी उडाली आकाशी) प्रा.निलेश महाराज कोरडे (महावैष्णव ज्ञानोबाराय यांचे जीवनकार्य).
प्रा. एस.झेड. देशमुख (छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रशासन) आणि डॉ दिलीप पाटील भुजबळ (पोलीस प्रशासन आणि अध्यात्म) अशी नामवंत व्याख्यात्यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. या व्याख्यानमालेसाठी आळे येथील मा.बाळासाहेब जाधव महाविद्यालयाचे २०० हून अधिक विद्यार्थी, प्राध्यापक शिक्षकेतर वृंद आणि मोठ्या प्रमाणावर पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उपस्थिती होती. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ज्ञानामृत व्याख्यानमालेच्या निमित्ताने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांचे जीवन कार्य तुका आकाशाएवढा आणि संत एकनाथांचे भारूड व समाज प्रबोधन हे विषय ठेवण्यात आले होते. या निबंध स्पर्धेमध्ये पहिल्या पाच क्रमांकात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक – सानिका कैलास पोटे (एकपात्री एकनाथी भारूड).
द्वितीय क्रमांक कल्याणी गणपत पानमंद (संत ज्ञानेश्वरमहाराजाचे जीवन कार्य), तृतीय क्रमांक – सचिंता बहिरु औटी (संत ज्ञानेश्वर महाराजांचे जीवन कार्य ), चतुर्थ क्रमांक – माधुरी नवनाथ भुजबळ(संत ज्ञानेश्वरमहाराजांचे जीवन कार्य ), पंचम क्रमांक – ऋतूजा संजय हुलवळे (तुका आकाशा एवढा) यांचा नंबर आला.
असुन विजेत्या विद्यार्थ्यांचा सन्मान महाराष्ट्र राज्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे महानिरीक्षक डॉ. दिलीप भुजबळ, श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संदीप निमसे, उपाध्यक्ष निलेश पिंगळे, सचिव अविनाश कु-हाडे, खजिनदार अमोल भुजबळ, व्यवस्थापक कान्हू पाटील कु-हाडे, ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष अजय कु-हाडे, उपाध्यक्ष सौरभ डोके.
मानद सचिव अर्जुन पाडेकर, खजिनदार अरुण हुलवळे संचालक किशोर कुऱ्हाडे, संतवाडी गावचे माजी सरपंच पांडुरंग पाडेकर, नामदेव दिघे , अखंड हरिनाम सप्ताह कमिटीचे अध्यक्ष संजय कुऱ्हाडे देवस्थान ट्रस्ट व ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे सर्व संचालक मंडळाच्या हस्ते देण्यात आली.या व्याख्यानमालेसाठी बाळासाहेब जाधव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण जाधव.
उपप्राचार्य प्रा. संजय वाकचौरे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. जयसिंग गाडेकर, राष्ट्रीय छात्र सेनेचे डॉ.रावसाहेब गरड व डॉ.सुषमा कदम, विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रमुख प्रा.संतोष राठोड यांनी विशेष कष्ट घेतले.