लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आळेफाटा पोलिसांचे पथसंचलन
1 min read
आळेफाटा दि.१६:- अगामी लोकसभा निवडणूक शांततामय व निर्भय वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी तसेच सध्या सुरु असलेले रमजान ईद उपवास / यात्रा उत्सव सणांचे अनुषंगाने आळेफाटा (ता.जुन्नर) पोलीस स्टेशन हद्दीत महत्वाचे गाव बाजारपेठ मुस्लिम संमिश्र वस्ती मध्ये शनिवार दि.१६ रोजी १०.०० वा ते १२.०५ या वेळेत आळेफाटा. राजुरी, बेल्हे, बोरी बुद्रुक मध्ये या ठिकाणी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल व स्थानिक पोलीस स्टेशन कडील अधिकारी व अंमलदार यांचेकडून पथसंचलन करण्यात आले. सदर पथसंचलनास आळेफाटा पोलीस स्टेशन कडील २ अधिकारी व १७ अंमलदार होमगार्ड – १० व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल चे २ अधिकारी व ४८ जवान सहभागी झाले होते.