सराईत गुन्हेगार विनापरवाना गावठी पिस्तुल बाळगल्या प्रकरणी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
1 min read
नारायणगाव दि.१३:- सराईत गुन्हेगाराने बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगल्या प्रकरणी कारवाई करण्याच्या सुचना जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पुणे ग्रामीण पोलीसांना दिल्या.त्यानुसार दि. ८ मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणचे पथक जुन्नर विभागात पेट्रोलिंग करत असताना. पथकाला गोपनीय बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की, सराईत गुन्हेगार पवन थोरात (रा. मंचर, ता. आंबेगाव) हा त्याच्या ताब्यात असलेले एक गावठी पिस्टल कमरेला लावून मोटरसायकल वर बसून नारायणगाव-मांजरवाडी रोड ला येणार आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने या पथकाने सापळा रचून एका संशयित इसमास ताब्यात घेऊन त्याला त्याचे नाव पत्ता विचारले असता.
त्याने त्याचे नाव पवन सुधीर थोरात (वय २४ वर्षे, रा. चाळीस बंगला रोड, मंचर, ता. आंबेगाव जि. पुणे) असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी पिस्तुल व एक जिवंत काडतूस मिळून आले. त्याच्याकडून मोटार सायकलसह एकूण ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी पवन सुधीर थोरात रा. मंचर याच्या विरोधात खूनाचे ०२ गुन्हे, खुनाचा प्रयत्न, मारामारी, आर्म अॅक्ट अंतर्गत एकूण ०९ गुन्हे दाखल असून त्याचेवर यापूर्वी मोक्का कायद्यांतर्गत देखील कारवाई करण्यात आलेली आहे. दरम्यान ही यशस्वी कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे.
उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पो.स.ई. अभिजित सावंत, पो.हवा. दिपक साबळे, विक्रम तापकीर, राजू मोमीन, अतुल डेरे, पो.ना. संदिप वारे, पो.कॉ. अक्षय नवले, पो.कॉ. निलेश सुपेकर यांनी केली.