बेल्ह्यातील शिंदे मळ्यात भर दिवसा चोरी, ७५ हजार रुपयांचे दागिने लंपास
1 min read
बेल्हे दि.१५:- बेल्हे (ता.जुन्नर) येथील शिंदे मळ्यात रोजी मंगळवार दि.१२ सकाळी साडेदहाच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने घरात शिरून सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे.यामधे एकूण ७५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून आले आहेत.याबाबत सविस्तर माहिती अशी की शिंदे मळ्यात पार्वती रामदास शिंदे (वय 62) या घरामध्ये असताना तुमचा मुलगा निलेश शिंदे हा माझा मित्र असून त्याचे आधार कार्ड घेण्यासाठी त्यांनी मला पाठवले आहे. आधार कार्ड घेण्याच्या बहनाने घरात शिरून कपाटात उसका पाच करून कपाटातील १ तोळ्यांची सोन्याची चैन (अंदाजे रक्कम ५० हजार रुपये).
कानातील सोन्याचे ५ ग्रॅम चे डुल (अंदाजे रक्कम २५ हजार रुपये) असा एकूण ७५ हजार रुपयांच्या ऐवजी चोरून नेला आहे. अशी फिरत पार्वती रामदास शिंदे यांनी आळेफाटा पोलिसात दिली आहे. दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझे पती हे घरामध्ये झोपलेले होते.
त्यावेळी एक इसम (नाव पत्ता महित नाही) हा त्यांचेकडे असलेली मोटारसायकल (तिचे नाव व नंबर महित नाही) ही घेवुन आमचे घराचे अंगणात येवुन मोटारसायकल ही आमचे घराचे अंगणात उभी करून तो इसम घरामध्ये आल्यावर मी त्या इसमाला विचारले की, तुम्हाला कोण पाहिजे तेव्हा तो इसम मला म्हणाला की, मी तुमचा मुलगा निलेश शिंदे यांचा मित्र असुन मी निलेश शिंदे याला ओळखतो.
निलेश शिंदे यांची पत्नी निकिता हिचे माहेर बेल्हे येथे आहे. तुमचा मुलगा निलेष हा निघोज येथील पतपेढी येथे कामाला आहे.असे सांगुन निलेष याने मला त्यांचे आधारकार्ड आणण्यास पाठविले आहे. तेव्हा मी त्याला सांगितले की, कपाटामध्ये निलेष यांचे आधारकार्ड आहे. तेव्हा तो इसम यांने मला पाणी आणण्यास सांगितल्याने मी पाणी आणण्यास घरामध्ये गेले.
त्यावेळी त्यावेळी तो इसम घराचे बेडरूमध्ये असलेले कपाटामध्ये उचका पाचक करून कपाटाचे ड्रावर उघडत होता. मी पाणी घेवुन आल्यावर तो इसम म्हणाला की, निलेशचे आधारकार्ड सापडले असुन ते मी घेवुन जात आहे. तो इसम घरातुन निघुन गेल्यानंतर मी कपाटाचे ड्रावर पाहिले असता त्यामध्ये बाऊन रंगाचे पकिट नव्हते.
त्या पकिटामध्ये माझा मुलगा निलेश यांची १ तोळे वजनाची सोन्याची चैन, त्यांची पत्नी माझी सुन निकिता हिचे कानामधील ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे डुल नव्हते. एकूण रक्कम ७५ हजार रुपये चे सोन्याची चोरी झाल्याचे निदर्शनास आले.या घटनेचा पुढील तपास आळेफाटा पोलीस करत आहेत.