बकऱ्याचे आमिष दाखवून लुटणारे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 min read

उरुळी कांचन दि.९:- हैद्राबाद येथील एकास व्यवसाय करण्यासाठी स्वस्तात बकऱ्या विकत घेवून देण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला स्थानिक गुन्हे (ग्रामीण) शाखा व उरूळी कांचन पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.अमोल काढण भोसले (वय ३२, रा. कोळगाव पांढरेवाडी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर), शिवा पैदास ऊर्फ सुरेश चव्हाण वय १९, रा. वेठेकरवाडी ता. श्रीगोंदा जि. अहदनगर). व श्याम पैदास ऊर्फ सुरेश चव्हाण वय २३ वर्षे रा. वेठेकरवाडी ता. श्रीगोंदा जि. अहदनगर), अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश
शिळीमकर यांनी दिली.हैद्राबाद येथील एकास व्यवसाय करण्यासाठी स्वस्त दरात बकऱ्या घेवून देतो. असे सांगून ऊरुळी कांचन येथे बोलावून घेवून त्यास व साथीदारांना बकऱ्या दाखविणेसाठी शेताकडे नेले. त्या ठिकाणी त्यांना मारहाण करून त्यांच्याजवळील रोकड ५ लाख, चेन असा ५ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला होता. याबाबत अब्दुला शेख यांनी उरूळी पोलिसांत फिर्याद दिली होती. समांतर तपासात हा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार अमोल भोसले याने त्याचे साथीदारांचे मदतीने केल्याचे समजले.संशयित गुन्हेगार भोसले हा साथीदारांसोबत लोणावळा परिसरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तिघांना सापळा रचून ताब्यात घेतले. दरम्यान, त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे