व्यावसायिकाला धमकावून खंडणी मागणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखाने केली अटक
1 min read
मंचर दि.९: पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंचर, ता. आंबेगाव गावचे हद्दीत निघोटवाडी फाटा येथे गुरुवार दि.७ रोजी २३:५० वा. चे सुमारास निघोटवाडी फाटा येथे नवीन पुणे- नाशिक हायवे रोडचे पुलाखाली इसम नामे १) सलमान हसनअब्बास सय्यद, वय – २९ वर्षे, रा. मार्केट यार्डचे पाठीमागे, मंचर, ता. आंबेगाव जि. पुणे २) समीर महादेव जाधव, वय १८ वर्षे ६ महिने, रा. पिंपळगाव रोड मंचर, ता.आंबेगाव, जि. पुणे. हे त्यांच्या कडील युनिकॉर्न मोटर सायकल वर एक प्लास्टिकचे पिशवीत ८,०००/- रुपये किमतीचा ५८० ग्रॅम वजनाचा गांजा विक्रीसाठी आपले कब्जात बाळगले असताना मिळून आले. सदर बाबत दोन्ही इसमां विरुद्ध पो.हवा. दिपक साबळे यांनी मंचर पो.स्टे. गु.र.नं. १८८/२०२४ एनडीपीएस कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वी दि ०३/०३/२०२४ रोजी १६:०० वा चे सु. मंचर गावाचे हद्दीत घोडेगाव रोडला शामानंद बारचे शेजारी असलेल्या नितीन चिंतामण वाळुंज यांचे व्हिडिओ गेमचे दुकानात आरोपी १) समीर महादेव जाधव, वय – १८ वर्षे, रा. मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे २) राम सुरेश जाधव,रा. मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे यांनी आम्ही राण्या बाणखेले याचा मर्डर केला आहे.
आम्ही सर्व मंचर, नारायणगाव, आळेफाटा येथे व्यापाऱ्याकडून हप्ते गोळा करणार आहे. असे म्हणून जोरजोरात आरडा ओरडा करून ५०००/- रू हप्ता मागून तुम्ही हप्ता दिला नाही तर तुम्हाला मारून टाकू अशी धमकी देऊन तेथे असलेले सामान तोडून नुकसान केले. बाबत मंचर पोलीस स्टेशन गु. रजि. नं. १८४/२०२४, भा दं वि कलम ३८६, ४२७,५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यापासून स्थानिक गुन्हे शाखा व मंचर पोलीस स्टेशन आरोपींचा शोध घेत होते. आरोपी नामे समीर महादेव जाधव, वय – १८ वर्षे ६ महिने, रा. मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे हा विधी संघर्षित बालक असताना यापूर्वी खालील गुन्हे दाखल आहेत.१) मंचर पोलीस स्टेशन गु.र.नं. ४५९/२०२१, भा. दं. वि. कलम ३०२, १२०(ब), ५०६, ३४ आर्म ॲक्ट ३(२५)(२७)
२) नारायणगाव पोलीस स्टेशन गु.र.नं. ४५९/२०२१, भा. दं. वि. कलम ३८७, १२०(ब), ३४ आर्म ॲक्ट ३(२५), २५(६), २५(७), २५(८) मोक्का ३(I), ३(II), ३(४)
३) मंचर पोलीस स्टेशन गु.र.नं. ५२/२०२३ भा. दं. वि. कलम ३०७,१४३, १४७, १४९, ५०४,५०६ तरी सदर गुन्ह्यातील आरोपी समीर महादेव जाधव हा मिळून आला आहे.सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, यांचे मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर पो.नि. अरुण फुगे (मंचर पो स्टे.) पो.स.ई. अभिजीत सावंत, पो.हवा. दिपक साबळे, पो.हवा. विक्रम तापकीर. पो. ना.संदीप वारे पो.कॉ अक्षय नवले पो.कॉ. निलेश सुपेकर मंचर पोलीस स्टेशनचे स.पो. नि. बालाजी कांबळे पो.हवा. संजय नाडेकर पो.कॉ. योगेश रोडे यांनी केली आहे.