वडगाव आनंद येथे २ कोटी ५ लक्ष रू च्या विकास कामांचे भूमिपूजन
1 min read
आळेफाटा दि.१३:- वडगाव आनंद (ता.जुन्नर) येथे २ कोटी ५ लक्ष रू च्या विकास कामांचे भूमिपूजन आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते संपन्न झाले. यामध्ये लेखाशिर्ष २५१५ – २०२३-२४ अंतर्गत वडगाव आनंद येथील मोक्षधाम मंदिर ते उंबरपट्टा रस्ता करणे. – ९०.०० लक्ष रू, वडगाव आनंद गावठाण परिसर कॉक्रीटीकरण करणे. – १०.०० लक्ष रू, वडगाव आनंद स्मशानभुमी सुधारणा करणे. – १०.०० लक्ष रू, वडगाव आनंद गावठाण ते स्मशानभुमी रस्ता कॉक्रीटीकरण करणे. – १०.०० लक्ष रू, वडगाव आनंद ग्रामपंचायत परिसर सुधारणा करणे. – १०.०० लक्ष रु, वडगाव आनंद ग्रेप्स गार्डन ते बाळासाहेब चौगुले घर रस्ता करणे.
– १०.०० लक्ष रू, जिल्हा नियोजन समिती २०२३-२४ लेखाशिर्ष ३९५४, ग्रामा. ६१ ते वडगाव आनंद ते पादिरवाडी कळमजाई रस्ता ग्रामा. २७० – २०.०० लक्ष रू, जिल्हा नियोजन समिती २०२३-२४ जनसुविधा, वडगाव आनंद एन.एच. २२२ ते कोकाटेपट्टा रस्ता करणे. – १०.०० लक्ष रू, जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण साकव कार्यक्रम २०२३-२४, वडगाव आनंद चौरेमळा येथे जयसिंग कुऱ्हाडे घरामागील साकव बांधणे.
– ३५.०० लक्ष रू, ३०५४ ग्रामीण मार्ग मजबुतीकरण व विस्तारीकरण २०२३-२४, वडगाव आनंद आडवा बोटा मार्ग पिंपरी पेंढार नवलेवाडी रस्ता करणे – ५०.०० लक्ष रू, वडगाव आनंद ग्रामा ६१ ते वडगाव आनंद ते पादिरवाडी कळमजाई रस्ता करणे. – २०.०० लक्ष रू, लेखाशिर्ष २५१५ इतर ग्रामविकास कार्यक्रम, आळेफाटा शिंदे हॉस्पिटल ते बेंदमळा रस्ता करणे – १० लक्ष रू.
अशा विविध कमांचे भूमिपूजन संपन्न झाले. या वेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.