आंबेगाव तालुक्यात महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम

1 min read

मंचर दि ९:- भावडी ग्रा पं सरपंच कमल कातळे, महिला भगिनी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी ,भावडी महिला संघटक सीमा कातळे आयोजित महिला दिन कार्यक्रमात विविध खेळ, पैठणी गायन असा दिवसभर भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर, जिल्हा संघटक प्रा राजाराम बाणखेले, उपजिल्हा प्रमुख दिलीप पवळे, महिला आघाडी तालुका प्रमुख प्रा सुरेखा निघोट , बाजार समिती संचालक मयुरी भोर, उपतालुका प्रमुख भरत मोरे, युवासेना उपतालुका प्रमुख हेमंत एरंडे, मंचर शहर प्रमुख विकास जाधव. मंचर नगरपंचायत निवडणुक समन्वयक अरुण बाणखेले, ग्रा पं सदस्य चैत्राली मोरे, ऊज्वला काळे, सारिका मोरे विद्या काळे, ज्योती नवले, शारदा चक्कर, साधना मोरे, सुशिला काळे उपस्थित होत्या. तर महिला दिनानिमित्त मंचर पोलिस स्टेशन येथे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अरुण फुगे यांच्या उपस्थितीत पोलिस नाईक निलम शिंदे, पोलिस नाईक, वैशाली भालेराव. कान्स्टेबल मनिषा शेळके, यांचा तर उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे वैद्यकीय अधिकारी प्रिया चव्हाण, डॉ शितल,प्रांजल, सारिका, परिचारिका धादवड यांचा सन्मान करण्यात आला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे