श्री क्षेत्र कुकडेश्वर मंदिर जतन व दुरुस्तीसाठी २ कोटी ७९ लक्ष रुपये निधी मंजूर; महाशिवरारात्री निमित्त कुस्त्यांचा जंगी आखाडा
1 min read
कुकडेश्वर दि.९:- महाशिवरात्री निमित्ताने जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके व शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजराव आढळराव पाटील यांनी श्री क्षेत्र कुकडेश्वर (ता.जुन्नर) यात्रोत्सवांला भेट दिली. या वेळी श्री क्षेत्र कुकडेश्वर मंदिराच्या उर्वरित जीर्णोद्धार कामाचा शुभारंभ आमदार अतुल बेनके व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत महाशिवरात्रीच्या दिवशी करण्यात आला.
उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने जिल्हा वार्षिक योजना सन २०२३ -२४ अंतर्गत कुकडेश्वर मंदिर, (पूर) जतन व दुरुस्तीसाठी २ कोटी ७९ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत.यात्रेच्या निमित्ताने कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते.