कुकडी प्रकल्पाच्या पाणी नियोजनातून वडज धरण वगळण्याची मागणी

1 min read

जुन्नर दि.७:- वडज (ता. जुन्नर) धरणातून मीना नदीला जनावरांना पिण्यासाठी सोडण्यात येणारे पाणी पिंपळगाव आर्वी गुंजाळवाडीपर्यंत सीमित करावे व कुकडी प्रकल्पाच्या पाणी नियोजनातून वगळण्यात यावे. अशी मागणी अखिल भारतीय शेतकरी विकास संघटनेने कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे लेखी निवेदन देऊन केली आहे. अशी माहिती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रमोद खांडगे यांनी दिली. कार्यकारी अभियंता प्रशांत कडुस्कर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जुन्नर तालुकाध्यक्ष नवनाथ भांबेरे, कार्याध्यक्ष प्रवीण डोंगरे उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, वडज उजवा कालवा
मधून परवानाधारकांना जनावरांच्या पिण्यासाठी पाणी मिळावे.वडज मीना पूरक कालव्याला एस के एफ (अतिवाहक) बसवण्यात यावे. अशी मागणी करण्यात आली.
वडज उजवा कालवा हा सुप्रमा असून तो लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावावा व वडज ते पिंपळगाव तर्फे नारायणगाव इतपर्यंत क्षेत्राचा त्यात समावेश करावा.वडज धरणातून मीना नदीला जनावरांना पिण्यासाठी सोडण्यात येणारे पाणी पिंपळगाव, आर्वी, गुंजाळवाडीपर्यंत सीमित करावे. १ टीएमसी पेक्षाही कमी पाणी असलेले वडज हे धरण २५ ते ३० टक्के गाळाने गाडलेले आहे. त्यावर तांबे, बारव, येणेरे, पारुंडे पासून खाली पिंपळगाव, आर्वी, गुंजाळवाडीपर्यंत मोठीछोटी गावे शेतीसाठी व पिण्यासाठी अवलंबून आहेत. सर्व शेतीक्षेत्र व पिण्याचा पाण्याचा वापर पाहिल्यास एवढे पाणी याच गावांना पुरेसे नाही. तसेच पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. कुकडी प्रकल्पाच्या पाणी नियोजनातून वडज धरण वगळण्यात यावे. हे पाणी पिण्यासाठी राखीव करावे. अशी मागणी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे