आळेफाटा येथील सुर्या करिअर अकॅडमी मध्ये मुलींना मोफत प्रवेश 

1 min read

आळेफाटा दि.५:-सुर्या करिअर अकॅडमी सैन्य व पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्र, आळेफाटा (ता.जुन्नर) येथे आगामी होणाऱ्या १७००० पोलीस भरतीसाठी १० मार्च पासून स्पेशल बॅच सुरू करण्यात आली असून NCC (C), आदिवासी भागातील विद्यार्थी व अनाथ मुलांना मोफत प्रशिक्षण मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

तसेच १२ वी पास झालेल्या मुलांसाठी फी मध्ये ५०% विशेष सवलत देण्यात येणार आहे. ही करिअर अकॅडमी आळेफाटा येथे अनेक वर्षा पासून कार्यरत असून येथे प्रशिक्षण घेणाऱ्या शेकडो मुला मुलींना या अकॅडमी मधून नोकरी लागली आहे. या अकॅडमी मध्ये अनुभवी तज्ञ शिक्षक वर्ग, अभ्यासिका मोफत, दररोज लेखी सराव परीक्षा, यशस्वी पोलीस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन,

परीक्षाभिमुख लेखी नोटस, निवासासाठी हॉस्टेलची स्वतंत्र व्यवस्था, १० वी नंतर ११ वी व १२ वी च्या शालेय शिक्षणासोबत भरतीचे प्रशिक्षण व्यवस्था, दररोज प्रत्येक विषयाचे ५ लेक्चर, ४०० मी. चा ट्रॅक असणारे पंचक्रोशितील एकमेव सुसज्ज मैदान असणारी अकॅडमी आहे. अधिक माहितीसाठी व प्रवेश घेण्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ९८६०७०९०७६ / ९०९६३०५२०९

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे