यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक ठरणार

1 min read

पुणे दि.३:- उन्हाळा हंगामात (मार्च ते मे) कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह देशाच्या अनेक राज्यांमध्ये तीव्र उष्ण लाटा येणार आहेत. उन्हाळ्यात एल-निनो स्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मार्च महिन्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीच्या वर राहण्याची शक्यता अधिक आहे. तर विदर्भात कमाल तापमान सरासरी इतके राहणार असल्याने या महिन्यातच उन्हाच्या झळा वाढणार आहेत. तर राज्यात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता जास्त असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाना, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तमिळनाडू राज्यात उष्णतेच्या तीव्र लाटा येण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे