आळे येथे श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या मुर्तीच्या वर्धापन दिना निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
1 min read
आळे दि.५:- आळे या ठिकाणी श्री क्षेत्र रेडा समाधीचा ७३१ व्या संजीवन समाधी सोहळा, श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या मुर्तीच्या ६९ व्या वर्धापन दिन व महाशिवरात्रीच्या निमित्ताने दि.७ पासुन अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दैनंदिन कार्यक्रमात काकडा, अभिषेक महापुजा, सामुदायिक पारायण सोहळा. शेणाचे भजन,हरिपाठ तसेच सात ते नऊ या वेळेत महाराष्टातील नामवंत असलेले सर्वश्री ह.भ.प.शिवनेर भुषण राजाराम महाराज जाधव (बोरी),ज्ञानेश्वर महाराज (छोटे माऊली) कदम यांच्या शुभहस्ते श्री रेडा समाधीवर पुष्पवृष्टी होणार आहे , डॉ.विकासानंद मिसाळ,संजय नाना धोंडगे,भावार्थ महाराज देखणे,सुदाम महाराज बनकर,केशव महाराज हगवणे.
ज्ञानेश्वर महाराज कु-हाडे,गुरूवर्य पाडुरंग महाराज घुले यांची किर्तण सेवा होणार आहे .तसेच येथील देवस्थान ट्रस्ट च्या वतीने भाविक भक्तांसाठी दररोज ज्ञानामृत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये लता मुळे या श्री ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ ,अनिल केंगार हे एकपात्री संत एकनाथी भारूडातुन जनजागृती.
प्रा.प्रदिप कदम हे रणधुरंधर जावा अर्थात छत्रपती संभाजी महाराज या विषयावर,प्रा.डॉ.शाकुराव कोरडे मुंगी उडाली आकाशी ,प्रा.निलेश महाराज कोरडे महावैष्णव ज्ञानोबाराय द मॅनेजमेंट गुरू ,प्रा.एस.झेड देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांचे शासन व राज्याचे विशेष पोलिस निरीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ पोलीस प्रशासन आणि अध्यात्म या व्याख्यात्यांची या विषयांवर व्याख्याने होणार आहे.
तरी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती अखंड हरिनाम सप्ताह कमेटीचे अध्यक्ष संजय कु-हाडे,देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष संदीप निमसे,उपाध्यक्ष निलेश पिंगळे,सचिव अविनाश कु-हाडे ,खजिनदार अमोल भुजबळ व व्यवस्थापक कान्हू पाटील कु-हाडे यांनी केली आहे.