आळेफाटा येथील शुभम तारांगण हरित गृह प्रकल्पाचे काम ८० टक्के पूर्ण

1 min read

आळेफाटा दि.३:- उत्तर पुणे जिल्ह्यातील, निसर्गरम्य जुन्नर तालुक्यातील, शिवछत्रपतींच्या पावन जन्मभूमीतील, जिथे संत श्री ज्ञानेश्वरांनी रेडा मुखी वेद वदविले अशा आळेगावातील म्हणजेच आळेफाटा शहरामध्ये शुभम तारांगण हरित गृह प्रकल्प पूर्णतवास येत आहे. शहराच्या विकासात हातभार लावण्यासाठी पुणे- नाशिक व मुंबई – विशाखापट्टणम महामार्गांची दुतर्फा कनेक्टिव्हिटी लाभलेली आहे व जवळच प्रस्तावित पुणे – नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वेचे जंक्शन देखील बनणार आहे.यामुळे शहरला आर्थिक व व्यपारीक दृष्ट्या महत्व प्राप्त होत आहे.शहर व परिसरात मनांकित शिक्षण संस्था, हॉस्पिटल्स, मार्केट, व्यावसायिक संस्था इत्यादी आहेत. यामुळे शहराचा विकास झपाट्याने होत आहे.विकासाच्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन शुभम डेव्हलोपर्सने शुभम तारांगण गृह प्रकल्प उदयास आणला आहे. प्रकल्पाचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून लवकरच ताब्याची तयारी चालू आहे.प्रकल्प एकूण साडेआठ एकरामध्ये असून प्रकल्पात चारही बाजूने आर सी सी भिंत असल्या मुळे येथे राहण्यास महिलांना, मुलांना व वृद्धांना सुरक्षित वातावरण भेटते. प्रकल्पा मध्ये पाण्याचे भक्कम श्रोत उपलब्ध आहेत. शुभम तारांगण हा पर्यावरण पूरक हरित गृह प्रकल्प आहे. प्रकल्प ५०० पेक्षा अधिक झाडांच्या सानिध्यात आहे. यामुळे येथे वृद्धांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी मोकळी हवा व सुंदर वातावरण भेटले आहे, आरोग्याची व पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी प्रकल्पा मध्ये विविध योजना रबावल्या जात आहे. शुभम तारांगण प्रकल्पाला हरित गृह प्रकल्प म्हणण्याचे कारण म्हणजे, येथे पर्यावरण पूरक व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहे. त्या सर्व गोष्टी प्रकल्पामध्ये राबवल्या जातात. यामुळेच शुभम तारांगण गृह प्रकल्पाला महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील इंडियन ग्रीन बिल्डींग कौन्सिल यांच्याकडून प्लॅटिनम रेटिंग हा मान देखील मिळाला आहे.शुभम तारांगण गृह प्रकल्प मुळात निसर्गाच्या सानिध्यात आहे. पाण्याने संपन्न आहे. प्रकल्पामध्ये पुणे, मुंबई मेट्रो सिटींमधील घरांमध्ये ज्या पद्धतीने सुख सुविधा दिल्या जातात त्याच पद्धतीने ग्रामीण भागातही शुभम तारांगण प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला भेटतात. शहरातील लोकांना जेव्हा ग्रामीण भागात आपल्याला शेताच्या व शहराच्या जवळ आपलं घर असाव असं वाटते, ती इच्छा शुभम तारांगण हरित गृह प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्ण होताना दिसत आहे. म्हणूनच जुन्नर तालुक्यातील सर्वात मोठा गृह प्रकल्प, शहराच्या व तालुक्याच्या विकासात हातभार लावत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे