श्री हॉस्पिटल येथे होणार रोटरी डायलेसीस सेंटर

1 min read

आळेफाटा दि.२:- रोटरी क्लब आळेफाटा सेंट्रल व सिध्दकला हॉस्पिटल पेण श्री हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आळेफाटा (ता.जुन्नर) येथे रोटरी डायलेसीस सेंटरचे भव्य उद्घाटन तसेच भव्य हृदयरोग व मुत्ररोग शिबीर रविवार दि.०३ मार्च रोजी सकाळी १० वाजता श्री हॉस्पिटल येथे संपन्न होणार आहे.

हे उद्घाटन डॉ. मनिष व. वानगे (सिध्दकला जनरल हॉस्पिटल, पेण) व डॉ. सोनाली म. वानगे (सिध्दकला जनरल हॉस्पिटल, पेण) यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.या कार्यक्रमासाठी पुढील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. रो. पल्लवी साबळे मॅडम (रोटरी क्लब पुणे डाऊन टाऊन झोनल प्रमुख, ग्रीन सोसा. & फॅक्टरीज्), डॉ. मनोज काचळे (अध्यक्ष, जुन्नर तालुका मेडीकल. प्र. असो.)

डॉ. शिवाजी सोनवणे (उपाध्यक्ष, जुन्नर तालुका मेडीकल. प्र. असो.), डॉ. संतोष ढवळे (सक्रेटरी, जुन्नर तालुका मेडीकल. प्र.असो.), डॉ. महादेव वाणी (कोषाध्यक्ष, जुन्नर तालुका मेडीकल. प्र. असो.), तर या कार्यक्रमाचे आयोजन रो. विजयकुमार पा. आहेर (अध्यक्ष- रोटरी क्लब आळेफाटा, सेंट्रल), रो. संभाजी हाडवळे सर (उपाध्यक्ष रोटरी क्लब आळेफाटा, सेंट्रल).

(रो. पराग गांधी सचिव रोटरी क्लब आळेफाटा, सेंट्रल), रो. डॉ. सचिन शिंदे (श्री हॉस्पिटल आळेफाटा) हॉस्पिटल आळेफाटा, डॉ. मनिषा स. शिंदे (श्री हॉस्पिटल आळेफाटा) सर्व सन्माननिय सदस्य रोटरी क्लब आळेफाटा सेंट्रल यांनी केले आहे.

या शिबिरातील गरजू रुग्णांवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मुतखडा, प्रोस्टेट, ऍन्जीओप्लास्टी मोफत करण्यात येईल.अधिक माहितीसाठी मोबा. 9096399384 या नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे