राज्यात अवकाळी पाऊस हजेरी लावणार

1 min read

पुणे दि.२:- गेल्या चार ते पाच दिवसांपासून महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसत आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असून रब्बी हंगामातील पिकांसह फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. अशातच पुढील दोन दिवस पावसाची अशीच परिस्थिती राहील असं हवामान खात्याने सांगितलं आहे. अशातच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीड जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यात गारपीटीसह जोरदार पावसाची शक्यता. हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.तसेच मध्य महाराष्ट्रातील धुळे, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे