पुणे – नाशिक महामार्गावर तीन वाहनांच्या विचित्र अपघात; तिघांचा मृत्यू
1 min read
मंचर दि.१७:- पुणे – नाशिक महामार्गावर शुक्रवार (दि.१७) पहाटे साडेपाच वाजता नाशिक बाजुकडून येणाऱ्या मारुती स्विफ्ट कार MH १४ DT ०२९५ चा मंचर अवसरी फाटा येथील पेठ घाटाच्या सुरुवातीलाच गोरक्षनाथ मंदिरासमोरील महामार्गावरुन खेडला जात असता पुण्याकडुन येणाऱ्या ट्रक MH १२ QG ३३५१ ने डिव्हायडर ला धडक देऊन दुसऱ्या बाजूच्या कारला उडवल्याने कारमधील तिघे ठार झाले. या अपघातात स्विफ्ट कार मधील अंकुश उर्फ अनिकेत ज्ञानेश्वर भांबुरे वय ३२, वीरेंद्र विजय कदम दोघेही रा. खेड ता. खेड, रोहिदास लक्ष्मण राक्षे रा. राक्षेवाडी ता. खेड हे मयत झाले असून दत्तात्रय चंद्रकांत गोतारणे वय ३२ रा. राजगुरूनगर ता. खेड जिल्हा पुणे हे जखमी झाले आहेत.
ट्रक ड्रायव्हर जखमी झाले, याच नियंत्रण सुटलेल्या ट्रकने बंद पडलेल्या कंटेनर ला जोरात धडक दिल्याने कंटेनर PB 10 GK 5315 मध्ये झोपलेले दोन ड्रायव्हर किरकोळ जखमी झाले. आज सकाळी अपघातग्रस्त वाहने पोलिस व नागरिकांनी क्रेन च्या मदतीने हलवल्याने वहातुक कोंडी कमी झाली यात आळेफाटा महामार्ग प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक अशोक पिंपळे.
मंचर पोलिस स्टेशन चे उपनिरीक्षक सोमशेखर शेटे, ठाणे अंमलदार राजेंद्र हिले, अढारी, संजय नाडेकर, कान्स्टेबल योगेश रोडे, संजय नलावडे तसेच रुग्णवाहिका चालक स्वप्निल मोरे,गौरव बारणे,अमित काटे, गणेश शिंदे यांनी अपघातस्थळी मदत केली.