कल्याण- नगर महामार्गावर एसटी बस, इको व ट्रॅक्टरचा भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू 

1 min read

भाळवणी दि.२४:- नगर- कल्याण महामार्गावर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर, ठाणे- मेहकर एसटी बस आणि इको गाडी यांचा भीषण अपघात झाला. ढवळपुरी फाट्या नजीक आज बुधवारी (२४ जानेवारी) पहाटे २.३० वाजता भीषण आपघात झाला असून यात ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

यापैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह पारनेर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तर एकाचा अहमदनगर येथे उपचार चालू असताना मृत्यू झाला आहे. सहायक पोलिस निरिक्षक प्रमोद वाघ आणि टीम तात्काळ घटना स्थळी जाऊन अपघातग्रस्तांना तातडीने मदत केली.

हा अपघात इतका भीषण होता, की यामध्ये तिन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला. या घटनेतील मृतांची नावे १.नीलेश रावसाहेब भोर – दसवडे, २. जयवंत रामभाऊ पारधी – जांबुत खुर्द, ३. संतोष लक्ष्मण पारधी – जांबुत खुर्द, ४. प्रकाश रावसाहेब थोरात – वारणवाडी, ५. सचिन कांतीलाल मंडलेचा – टाकळी मानूर, ६. अशोक चिमा केदार – जांबुत खुर्द, तर सुयोग अडसूळ हे गंभीर जखमी झाले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे