बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला ठार

1 min read

राहाता दि.१६:- राहाता तालुक्यातील लोणी येथे बिबट्याच्या हल्ल्यात नऊ वर्षाचा अथर्व प्रवीण लहामगे ठार झाला. या घटनेने लोणी परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयासमोर गोसावी वस्तीवर राहत असलेल्या लहामगे कुटुंबातील प्रवीण लहामगे यांचा मुलगा सायंकाळी संदीप नवनाथ गोसावी यांच्या घरी खेळण्यासाठी गेला होता.

त्यानंतर संदीप गोसावी यांचा मुलगा गणेश हा अथर्वसोबत दूध आणण्यासाठी गेले होते. दूध घेऊन आल्यानंतर गणेश हा घरामध्ये दूध देण्यासाठी गेला. त्यानंतर त्याने बाहेर येऊन बघितले असता अथर्व त्याला तेथे दिसून आला नाही.

त्याला वाटले की अथर्व हा घरी गेला. त्यानंतर अथर्व याच्या घरच्यांनी संदीप गोसावी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की अथर्व घरी आला नाही. गोसावी कुटुंबाने सांगितले की अथर्व घरी जाऊन खूप वेळ झाला आहे.

त्यानंतर लहामगे कुटुंबीयांनी अथर्वचा शोध घेतला. अथर्व हा रात्री अकरा ते साडेअकराच्या सुमारास संदीप गोसावी यांच्या मालकीच्या मकाच्या शेतात गंभीर जखमी अवस्थेत सापडला. अथर्वला प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

बिबट्याच्या हल्ल्यात अथर्व मयत झाला. लहामगे कुटुंब ज्या परिसरामध्ये राहतात, त्या परिसरातील नागरिकांनी वन विभागाला पिंजरा लावण्याची वारंवार मागणी केली होती. सदर घटनेची माहिती वन विभागाला मिळताच कोपरगाव वनविभाग परिक्षेत्राचेवन अधिकारी सागर केदार यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पाहणी करून पंचनामा केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे